महाराष्ट्रातील शासकीय नोकरींच्या परीक्षांबद्दल अधिक माहितीसाठी आणि परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले नाव आणि आपला Mobile No. व E -mail ID खालील Form मध्ये भरून Submit करा.
——-x–x–x——
बहुतेक वेळा शासनाकडून अपुरे मागणीपत्र येणे, मागणीपत्रच न मिळणे, न्यायालयीन प्रकरणांमध्ये परीक्षा अडकणे अश्या कारणांमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा रखडतात. उमेदवार आयोगानी दिलेल्या अंदाजित वेळापत्रकाप्रमाणे अभ्यासाचे नियोजन करतात पण परीक्षा व निकाल रखडल्याने उमेदवारांचे सर्व नियोजन कोलमडते. अनेक उमेदवारांना यामुळे मनस्तापाला सामोरे जावे लागते.
Related : Tips and Tricks to Solve MPSC Prelims
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षांचे वेळापत्रक पाळले जात नाही, ही सर्वच उमेदवारांना परिचित असलेली बाब. अश्या रखडलेल्या परीक्षा, निकाल या सर्व गोष्टीशी कसा सामना करावा हे आपण या लेखात जाणून घेवू.
घटनांना सकारात्मक घ्या
आयोगाचे वेळापत्रक रखडणे हे उमेदवार म्हणून तुमच्या हातात नसते, त्यामुळे याचा त्रास करून घेवू नका. परीक्षा रखडणे याला नकारात्मक न घेता, यामुळे मला परीक्षेची अधिक तयारी करता येईल अश्या सकारात्मक दृष्टीने याकडे पहा.
असा सकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला पुढे प्रशासकीय सेवेत असताना गोष्टी आणि घटनांना एका वेगळ्याच दृष्टीने पाहण्यासाठी उपयोगी ठरेल.
Related : 5 Most Common Mistakes Candidates Make during MPSC Preliminary Exams!
उजळणी करा
या शेवटच्या टप्प्यात तुम्ही बनवलेल्या नोटसद्वारे उजळणीवर भर द्या. गणितासारख्या विषयांचे प्रश्न कमीत कमी वेळेत कसे सोडवता येतील यावर लक्ष द्या.
अनेक उमेदवार परीक्षा पुढे ढकलल्यावर निश्चिंत होऊन अभ्यास व सराव करणे थांबवतात, असे अजिबात करू नका. या अधिकच्या वेळेला सत्कार्यी लावा.
Related : MPSC Reference Books List in Marathi
सराव चाचण्या द्या
अभ्यास कितीही चांगला झाला असला तरी परीक्षेच्या त्या ठरविक वेळात तो मांडता न आल्यास त्याचा काही फायदा नसतो. या जास्तीच्या वेळेत अधिक सराव चाचण्या सोडवा. परीक्षागृहाचे वातावरण बनवण्यासाठी शांत ठिकाणी वेळ लावून ओएमआर शीटवर सराव चाचणी द्या.
Related : Tips to Crack MPSC without Coaching Classes
आरोग्याकडे लक्ष द्या
फिसकटलेल्या वेळापत्रकाचा मनस्ताप होणे हे साहजिकच आहे, पण अश्या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. सकस आहार आणि नियमित व्यायामाद्वारे तुम्ही यासारख्या परिस्थितीशी सक्षमपणे सामना करू शकाल.
Related : 10 Effective Tips To Get Higher Marks in MPSC
- 10 Reasons Why Your Business Needs a Website - August 1, 2017
- 10 Essential Tips to Pick a Good Domain Name for Your Business - July 7, 2017
- How to Make a Website in 30 Minutes – (Step-by-Step Guide for Beginners) - July 3, 2017
