Tips to Crack MPSC without Coaching Classes

Tips to Crack MPSC without Coaching Classes
Spread the love

Tips to Crack MPSC without Coaching Classes

Maha-Tayari App Link

महाराष्ट्रातील शासकीय नोकरींच्या परीक्षांबद्दल अधिक माहितीसाठी आणि परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले नाव आणि आपला Mobile No. व E -mail ID खालील Form मध्ये भरून Submit करा.  

——-x–x–x——

MPSC च्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करताना चांगले मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे असले तरी अनेकदा आर्थिक परिस्थितीमुळे बऱ्याच उमेदवारांना स्व:अभ्यासावर अवलंबून राहावे लागते. अश्या परीक्षांमध्ये कोणत्याही क्लासेस किंवा मार्गदर्शनाशिवाय यश संपादन करणे काहीसे अवघड वाटत असले तरी अनेक गुणवंत उमदेवार कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय दरवर्षी विविध परीक्षांत यश मिळवताना दिसतात.

या लेखात आपण कोणत्याही क्लासेसशिवाय MPSC च्या विविध परीक्षांची तयारी कशी करावी हे जाणून घेवू.

ध्येय निश्चिती

सर्वप्रथम तुम्हाला MPSC च्या विविध परीक्षांपैकी कोणत्या परीक्षांसाठीची तयारी करायची आहे हे निश्चित करा आणि त्याप्रमाणे MPSC च्या संकेतस्थळावरून सदर परीक्षांचा अभ्यासक्रम जाणून घ्या. MPSC च्या वेळापत्रकानुसार सदर परीक्षांची जाहिरात कधी निघणार आहे?, पूर्व आणि मुख्य परीक्षा कधी आहेत? हे नोंद करून ठेवा.

वेळापत्रक आणि अभ्यासक्रमानुसार नियोजन करून अभ्यासाला सुरुवात करा.

Related : Tips and Tricks to Solve MPSC Prelims

अभ्यास साहित्य जमवा

अभ्यासक्रमानुसार संदर्भ पुस्तके गोळा करा. गेल्या काही वर्षातील परीक्षापत्रिका अभ्यासल्यास लक्षात येते की आयोगाचा कल उमेदवारांनी पाठांतरावर भर न देता संदर्भ पुस्तके अभ्यासावी असा आहे. NCERT ची शालेय पुस्तकांपासून अभ्यासाची सुरुवात करा याद्वारे तुमचा पाया भक्कम होईल.

त्यानंतर संदर्भ पुस्तकांचे वाचन करून नोट्स काढा. या नोटस तुम्हाला उजळणीसाठी फार उपयुक्त ठरतील.

Related : List of Posts in MPSC State Services Examination

वेळेचे नियोजन आणि कठोर पालन

क्लासेसमध्ये अभ्यास करताना उमेदवारांना वेळेचे नियोजन आणि त्याचे कठोर पालन करावे लागते पण कोणत्याही धाकाशिवाय नियमितपणे अभ्यास करणे हे मोठे आव्हान असते. यावेळेस स्वतःवर कठोर होवून कोणतेही कारणे न देता उमेदवारांनी नियमित अभ्यास करणे महत्वाचे आहे.

अभ्यासात सातत्य राखणे हीच क्लासेसशिवाय यश मिळवण्याची गुरुकिल्ली आहे.

Related : 5 Most Common Mistakes Candidates Make during MPSC Preliminary Exams!

गट अभ्यास

इंग्रजीत एक सुंदर वाक्य आहे.

If you want to go fast then go alone, if you want to go far then go together.

तुमच्याप्रमाणेच ध्येय असणाऱ्या इतर उमेदवारांसोबत एक गट बनवा. त्यांच्याशी अभ्यासाबद्दल चर्चा करा. तुम्हाला अभ्यासातील काही समजत नसल्यास तुमच्या गटातील इतरांची मदत घ्या. इतरानाही मदत करा. गट अभ्यासाद्वारे तुम्हाला इतर उमेदवार कसे अभ्यास करतात ते समजेल, त्याच्या अभ्यासातील युक्त्या कळतील.

या गटाद्वारे तुम्ही मुलाखतीचा सराव देखील करून शकाल.

Related : MPSC Reference Books List in Marathi

प्रेरित राहा

MPSC परीक्षांचे वेळापत्रक पाळले जात नाही ही आता सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. अभ्यास करताना बऱ्याचदा तुम्ही नकारात्मक व्हाल. अभ्यासतील सुरुवातीचा जोश ओसरू लागल्यावर अभ्यासाचा कंटाळा येईल, अश्या वेळी प्रेरित करणाऱ्या video /audio clips पहा.

यशस्वी उमदेवारांच्या video /audio clips पहा तुम्हाला प्रेरणा मिळेल.

Related : What You Should Do While Awaiting MPSC Exam

उजळणी आणि सराव करा

संदर्भ पुस्तकांचे वाचन झाल्यावर तुम्ही बनवलेल्या नोटसद्वारे उजळणी करा. सराव चाचण्या वेळ लावून सोडवा. याद्वारे तुम्ही वेळेच्या ताणाशी जुळवून घेवून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पश्न योग्य सोडवू शकाल.

 Related : 10 Effective Tips To Get Higher Marks in MPSC

 

Maha-Tayari App Link

5 comments on “Tips to Crack MPSC without Coaching Classes

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *