Special Scholarship For UPSC Aspiring Students in Maharashtra
दरवर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालानंतर ‘अखिल भारतीय सेवांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या राज्यातील उमेदवारांचा टक्का कसा वाढवावा?’ यावर नेहेमीच चर्चा होत असतात. राज्य सरकारने ही ‘राज्याचा टक्का’ वाढावा म्हणून विशेष प्रयत्न करावे, अशी मागणी बऱ्याच वर्षापासून केली जात होती.
नुकतीच या संबंधी गुणवत्ताधारित विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन भागांत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसह उमेदवारास प्रतिमहिना दहा हजार रुपयांचा निर्वाह भत्ताही मिळणार आहे.
Related : Tips and Tricks to Solve MPSC Prelims
शिष्यवृत्तीचे स्वरूप :
राज्य सरकारच्या या योजनेनुसार राज्यातील होतकरू आणि गुणवंत उमेदवारांना यूपीएससी परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या दिल्ली येथील नामांकित खासगी प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसहाय्य तसेच दिल्ली येथील त्याच्या प्रशिक्षणाच्या वास्तव्याच्या कालावधीत प्रतिमहिना दहा हजार रुपयांप्रमाणे निर्वाह भत्ता देण्यात येणार असून, या योजनेसाठी २३ कोटी ४६ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
Related : 5 Most Common Mistakes Candidates Make during MPSC Preliminary Exams!
शिष्यवृत्तीच्या पात्रता अटी :
- उमदेवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- उमेदवाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न कमाल दहा लाख रुपयांपर्यंत असावे.
- उमदेवार मागील तीन वर्षांमध्ये किमान एक वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखत फेरीपर्यंत पोहोचणारा, तथापि, अंतिमत: यशस्वी न झालेला असणे आवश्यक आहे.
Related : MPSC List of Exams
आवश्यक कागदपत्रे :
उमेदवाराने शिष्यवृत्ती अर्जासह पदवी परीक्षा प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, मागील तीन वर्षांपैकी उमेदवार ज्यावर्षी मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखत फेरीपर्यंत पोहोचलेला होता त्या वर्षीचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची गुणपत्रिका
Related : Tips to Crack MPSC without Coaching Classes
शिष्यवृत्तीचे प्रकार :
- भाग-१ (पूर्व परीक्षा ते मुलाखत)
- भाग-२ (मुख्य परीक्षा)
- भाग-३ (मुलाखत)
१ . भाग-१ (पूर्व परीक्षा ते मुलाखत)
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांना त्या वर्षीच्या मुलाखतीपर्यंतच्या कालावधीसाठी दिल्ली येथील निवडक प्रशिक्षण वर्गांमध्ये मुलाखतीपर्यंतच्या उपलब्ध असणाऱ्या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी भाग-१ ही शिष्यवृत्ती देण्यात येईल. या शिष्यवृत्तीचा लाभ घेणारा उमेदवार पूर्व परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याला दिली गेलेली भाग-१ ची शिष्यवृत्ती त्या वर्षासाठी समाप्त करण्यात येईल.
Related : What You Should Do While Awaiting MPSC Exam
२. भाग-२ (मुख्य परीक्षा)
भाग-१ चा लाभ न घेतलेल्या मात्र चालू वर्षात पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास भाग- २ व ३ चा घेता येवू शकेल. या शिष्यवृत्तीचा लाभ घेणारा उमेदवार मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याला दिली गेलेली भाग-२ ची शिष्यवृत्ती त्या वर्षासाठी समाप्त करण्यात येईल.
३. भाग-३ (मुलाखत)
तसेच भाग-१ व २ चा लाभ न घेतलेला मात्र मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेला उमेदवार भाग-३ च्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकणार आहे.
उमेदवार भाग-१ (पूर्व परीक्षा ते मुलाखत), भाग-२ (मुख्य परीक्षा) व भाग-३ (मुलाखत) अशा तिन्ही भागांचा प्रत्येकी एकदाच लाभ घेऊ शकतो.
Related : 10 Effective Tips To Get Higher Marks in MPSC
निवड प्रक्रिया :
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील वर्षीच्या परीक्षेसाठी या शिष्यवृत्तीचा अर्ज मुंबई येथील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या (STATE INSTITUTE FOR ADMINISTRATIVE CAREERS (SIAC) संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवाराचा शासनाने निवड केलेल्या दिल्ली येथील तीनपैकी एका प्रशिक्षण संस्थेत प्रवेश शुल्काचा भरणा शासनामार्फत केला जाईल.
- 10 Reasons Why Your Business Needs a Website - August 1, 2017
- 10 Essential Tips to Pick a Good Domain Name for Your Business - July 7, 2017
- How to Make a Website in 30 Minutes – (Step-by-Step Guide for Beginners) - July 3, 2017