10 Effective Tips To Get Higher Marks in MPSC
MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांवर सतत ताण व दडपण असते. या परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी पुस्तकी किड्यासारखा अभ्यास करणे हाच एक मार्ग आहे असा बऱ्याच जणांचा समज असतो. पण वास्तविक पाहता नियोजनपूर्ण अभ्यास, योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वासाने तयारी केल्यास या परीक्षात यश संपादन करणे तेवढे अवघड नसते.
ध्येय निश्चिती
सर्वप्रथम तुम्हाला MPSC च्या विविध परीक्षांपैकी कोणत्या परीक्षांसाठीची तयारी करायची आहे हे निश्चित करा आणि त्याप्रमाणे MPSC च्या संकेतस्थळावरून सदर परीक्षांचा अभ्यासक्रम जाणून घ्या. MPSC च्या वेळापत्रकानुसार सदर परीक्षांची जाहिरात कधी निघणार आहे?, पूर्व आणि मुख्य परीक्षा कधी आहेत? हे नोंद करून ठेवा.
Related : 5 Most Common Mistakes Candidates Make during MPSC Preliminary Exams!
योग्य अभ्यास साहित्य जमवा
अभ्यासक्रमानुसार संदर्भ पुस्तके गोळा करा. गेल्या काही वर्षातील परीक्षापत्रिका अभ्यासल्यास लक्षात येते की आयोगाचा कल उमेदवारांनी पाठांतरावर भर न देता संदर्भ पुस्तके अभ्यासावी असा आहे. NCERT ची शालेय पुस्तकांपासून अभ्यासाची सुरुवात करा याद्वारे तुमचा पाया भक्कम होईल.
Related : MPSC Reference Books List in Marathi
स्वतः नोटस काढा
परीक्षेच्या अंतिम काळात स्वतःच्या नोटस मधून सराव करण्यापेक्षा चांगले काहीच नसते. ज्यावेळी तुम्ही स्वतः नोटस काढता तेव्हा संदर्भ पुस्तक वाचताना, त्यातील मुद्दे वहीत मांडताना आणि जे लिहिले आहे ते योग्य आहे का हे तपासताना असे ३ वेळा वाचन होते शिवाय नोटस मधून सराव करताना माझे हे सर्व वाचून झाले आहे असा आत्मविश्वास ही वाटतो.
Related : 10 Effective Tips To Get Higher Marks in MPSC
चांगल्या गटात सामील व्हा
कोणत्याही परीक्षेची तयारी करताना आपल्या सभोवताली कोणत्या प्रकारच्या व्यक्ती आहेत यावरही बरच काही अवलंबून असते. MPSC परीक्षांचा नियोजनपूर्ण तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करा.
Related : Tips and Tricks to Solve MPSC Prelims
अधिक विचार करणे टाळा
MPSC परीक्षांची तयारी करताना उमेदवारांच्या मनात अनेक नकारात्मक विचार डोकावतात. यासारखे विचार उमेदवारांवरील ताणात भरच टाकतात. पण उमेदवारांनी अश्या विचारांना स्वतःवर नियंत्रण मिळवू देवू नये.
Related : MPSC List of Exams
सकस आहार आणि चांगली झोप
MPSC परीक्षांमध्ये यश मिळवणे हे सुदृढ शरीर आणि चांगल्या मानसिक आरोग्याविना फार अवघड आहे. अश्या परीक्षांमध्ये चांगले यश मिळवण्यासाठी उमेदवारांनी सकस आहार आणि चांगली झोप घेणे आवश्यक आहे.
Related : What You Should Do While Awaiting MPSC Exam
मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका अभ्यासा
मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका अभ्यासाल्याने आयोगाचा कोणत्या घटकांवर जास्त भर आहे हे लक्षात येईल शिवाय प्रश्न कोणत्या प्रकाराने विचारले जात आहेत हे सुद्धा अभ्यासता येईल. उदा. MPSC PSI | ASST | STI परीक्षेत पूर्वी बहुसंख्य प्रश्न एका ओळीतील असायचे पण सध्या तसे एका ओळीतील प्रश्न कमी दिसतात.
आयोगाच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवा
आयोगातर्फे परीक्षेचे वेळापत्रक पाळले जात नाही हे आपल्या सर्वाना माहित असते. निदान आठवड्यातून एकदा आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्या. नवीन घोषणा, नियमांमधील काही बदल, वेळापत्रकातील बदल, नवीन जाहिरात यांसारख्या महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष द्या.
Related : Tips to Crack MPSC without Coaching Classes
सराव चाचण्या सोडवा
अनेक उमेदवार अभ्यास उत्तम झालेला असूनही तो वेळेत योग्यपणे न मांडता आल्याने अपयशी होतात. परीक्षागृहातील ताणावर मात करण्यासाठी आणि भरभर योग्य उत्तरे सोडवण्यासाठी मुबलक सराव चाचण्या द्या.
महा-तयारी सारख्या Mobile App द्वारे आपण इंटरनेट शिवायही सराव चाचण्या देऊन हे वेळेचे गणित साधू शकाल. महा-तयारी App द्वारे आपण प्रवास करताना किंवा फावल्या वेळेतही सराव चाचण्या देऊ शकाल.
Related : List of Posts in MPSC State Services Examination
स्वतःला मनोरंजनासाठी वेळ द्या
MPSC च्या परीक्षांचा अभ्यास करणे, पूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा, मुलाखत या सर्वांसाठी बराच कालावधी लागतो. अश्या वेळी सतत पुस्तकी किड्यासारखा अभ्यासच करणे काही योग्य ठरणार नाही. अभ्यासातून वेळ काढून काही वेळ तुमच्या एखाद्या छंदाला द्या. मित्रांना भेटा. एखादा चांगला सिनेमा पहा. तुमचा आवडता खेळ खेळा अश्या छोट्या breaks मुळे तुमचे मन ताजेतवाने होईल आणि तुम्ही पुन्हा जोमाने अभ्यासाला लागाल.
महाराष्ट्रातील शासकीय नोकरींच्या परीक्षांबद्दल अधिक माहितीसाठी आणि परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले नाव आणि आपला Mobile No. व E -mail ID खालील Form मध्ये भरून Submit करा.
——-x–x–x——
- 10 Reasons Why Your Business Needs a Website - August 1, 2017
- 10 Essential Tips to Pick a Good Domain Name for Your Business - July 7, 2017
- How to Make a Website in 30 Minutes – (Step-by-Step Guide for Beginners) - July 3, 2017
