MPSC Announces Single Prelim Exam for PSI, ASST, STI

MPSC
Spread the love

Maha-Tayari App Link

MPSC Announces Single Prelim Exam for PSI, ASST, STI

PSI-ASST-STI साठी एकच पूर्वपरीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) पोलिस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI) आणि सहायक कक्ष अधिकारी (ASST) परीक्षांचे स्वरूप, अभ्यासक्रम जवळपास सारखा असूनही परीक्षार्थीना वर्षांतून तीन वेळा यापदांसाठी वेगवेगळ्या पूर्वपरीक्षा (MPSC Prelims) द्याव्या लागत असल्याने या तीन पदांसाठी एकच पूर्व परीक्षा (Prelims) असावी असे बरेच परीक्षार्थींचे मत होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकताच या मुद्दयांवर सकारात्मक घोषणा केली आहे.

पोलिस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI) आणि सहायक कक्ष अधिकारी (ASST) या पदांसाठी यापुढे आता एकच पूर्वपरीक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) घेतला आहे. या संदर्भातील परिपत्रक (Announcement) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे बदल 2017 हे पासून प्रसिद्ध होणार्‍या जाहिरातीपासून लागू होणार आहेत. यापूर्वी तिन्ही पदांसाठी स्वतंत्र पूर्वपरीक्षा घेण्यात येत होती.

Related : Tips to Crack MPSC without Coaching Classes

पोलिस उपनिरीक्षक (MPSC PSI), विक्रीकर निरीक्षक (MPSC STI) आणि सहायक कक्ष अधिकारी (MPSC ASST) या तीन ही Prelims/ पूर्वपरीक्षांसाठी परीक्षेची योजना, अभ्यासक्रम, गुण एकसमान आहेत. मात्र, यासाठी उमेदवाराला प्रत्येकवेळी अर्ज करणे, परीक्षा शुल्क भरणे यासाठी वेळ व पैसा पुन्हा पुन्हा खर्च करावा लागत होता. शिवाय वेगवेगळ्या पूर्वपरीक्षा घेतल्याने निवड प्रक्रियेतही विलंब होत होता. या बाबी टाळण्यासाठी आयोगाने या तिन्ही परीक्षांसाठी एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्याचा  निर्णय घेतला.

Related : Tips and Tricks to Solve MPSC Prelims

संयुक्त पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीनुसार अर्ज करणार्‍या उमेदवारांकडून ते यापैकी एक, दोन किंवा तीनही पदांसाठी ते बसू इच्छितात काय, याबाबतचा पर्याय देण्यात येणार आहे. हा पर्यायच संबंधित पदाकरिता अर्ज समजण्यात येणार आहे.  ही परीक्षा संबंधित उमेदवार उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणार्‍या उमेदवारांची संख्या निश्‍चित केली जाणार आहे. पूर्वपरीक्षा एकच असली तरी तीनही पदांकरिता स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या-त्या पदाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणार्‍या उमेदवारांची स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतली जाईल. या सर्वांमध्ये पूर्व (MPSC Prelims) व मुख्य (MPSC Mains) परीक्षांचा अभ्यासक्रम, गुण, वेळ इतर बाबीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे आयोगाने परिपत्रकात म्हटले आहे.

Related :  5 Most Common Mistakes Candidates Make during MPSC Preliminary Exams!

——-x–x–x——

महाराष्ट्रातील शासकीय नोकरींच्या परीक्षांबद्दल अधिक माहितीसाठी आणि परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले नाव आणि आपला Mobile No. व E -mail ID खालील Form मध्ये भरून Submit करा.  

——-x–x–x——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *